पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून एक तरुण बुडाला : अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही
बांबवडे प्रतिनिधी ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून एक ३५ वर्षे वयाचा युवक बुडाला असून, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. यासाठी आपत्ती व्यवस्थापन व जिवन रक्षक रेस्क्यू फोर्स च्यावतीने शोध मोहीम सुरु आहे.

शाहुवाडी तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पालेश्वर धरणाच्या सांडव्या च्या खाली पाण्यात राजेश बाबुराव पाटील वय ३५ वर्षे हा युवक बुडाला आहे. या दुर्घटनेच्या ३६ तासानंतर हि या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही.

सोमवार दि.१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजनेच्या दरम्यान लाटवडे तालुका हातकणंगले येथील काही युवक वर्षा पर्यटनासाठी आले होते. सांडव्याच्या खालच्या बाजूला वर्षा पर्यटनाचा आनंद घेत असताना राजेश पाटील हा अचानक पाण्यात बुडाला आहे. त्या दुर्घटने नंतर अद्यापही त्या तरुणाचा शोध लागलेला नाही.