…पुन्हा एकदा ” विसावा पॉईंट ” वर अपघात : १महिला व १ बाळ ठार तर अन्य जखमी
शाहुवाडी प्रतिनिधी : आंबा तालुका शाहुवाडी येथील घाटात विसावा पॉईंट वर अपघात झाला असून, सांगली येथील चार चाकी वाहन आहे. या अपघातामध्ये १ महिला व एक लहान बाळ ठार झाल्याचे समजते. हि घटना आज दुपारी ३ ते ५ वाजनेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप येणे आहे. परंतु चारचाकी वाहन kuv असल्याचे समजते.

आंबा येथील विसावा पॉईंट हा रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरपा येथील मुर्शी पोलीस आउट पोस्ट च्या हद्दीत येत असल्याने अधिकृत माहिती यायला उशीर लागत आहे. गाडीमध्ये सात जण असल्याची माहिती मिळत असून, हे कुटुंब सांगली येथील डॉक्टर कुटुंब असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना कोल्हापूर इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.