पृथ्वीराज बेंडखळे या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील कडवे पैकी खोतवाडी येथील पृथ्वीराज सतीश बेंडखळे या दहावी त शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी येलूर फाट्याजवळ अपघात झाला होता. काल दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या अपघाती घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली होती.
सोमवार ड.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी येलूर फाट्याजवळ चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली होती. यावेळी तो जागीच बेशुद्ध झाला होता. पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान काल दि.२६ ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले.