” पेपर फुटी “प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार- अभाविप
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : शिवाजी विद्यापीठात मागील अनेक दिवसांपासून पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत असूनही, याकडे विद्यापीठ कानाडोळा करीत आहे.याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून अनेकवेळा सूचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. म्हणून अभाविप च्या शाखेसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना वारंवार सूचित करूनही, त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान हा सर्व प्रकार घडत असून, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव वारंवार संबंधित कर्मचारी व प्राध्यापकांची पाठराखण करताना दिसले. यामुळे पेपर फुटी प्रकरणात त्यांचे हात दगडाखाली आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे आंदोलकांचे मत आहे. Bsc, BA, Msc micro biology पेपर फुटी प्रकरण, विद्यापीठाच्या रसायन शास्त्र विभागाच्या strong रूम ची किल्ली येथील कर्मचारी यांनी ७ वाजता घेचून गेले, आणि १० वाजता घेवून आले. हा प्रकार संशयास्पद आहे. विधी शाखेच्या IPR ( intelectual praperty law ) या पेपर मध्ये ५ प्रश्न बाहेरील आल्याचे सांगून पेपर च रद्द केला. परंतु खऱ्या अर्थाने तो पेपर, पेपर फुटल्यामुळे रद्द करण्यात आला होता, असे आंदोलकांचे मत आहे.

सदर च्या घटनेबाबत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली. म्हणून कार्यकर्त्यांनी लोटांगण घेत आंदोलन सुरु केले.

यावेळी अभाविप चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे म्हणाले कि, या सर्व प्रकारांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के गप्प का आहेत. विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे सोडून, इतर प्राध्यापक मंडळींना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहेत. हि बाब खूप गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा अभाविप च्या वतीने करण्यात येत आहे. असे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे अभाविप च्या वतीने सांगण्यात येत आहे.

यावेळी स्वप्नील पाटील, सौरव पाटील, अद्वैत पुंगावकर, दिनेश हुमनाबादे, गौरव ससे, गिरीधर सुतार, पूर्वा मोहिते, तृप्ती ऐतवडे, विद्या लोहार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.