पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सागाव पुलावर तात्पुरता निवारा : सार्व.बांधकाम विभाग
सरूड: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची हद्द सागाव ता. शिराळा येथील वारणा नदीच्या पुलावर आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी झाल्यामुळे या नदीवर वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पाहरा देत आहेत. यांच्यासाठी सार्व. बांधकाम विभागाच्यावतीने तात्पुरता निवारा त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.
सरूड येथील प्रशासनासाठी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, हे सतर्क असून गावाच्या हद्दीवर ते लक्ष ठेवून आहेत.