प्रगती चे पंख हे चिमण पाखरा…- प्राचार्य सचिन जद सर
बांबवडे : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी आणि प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज डोणोली तालुका शाहुवाडी यांच्यावतीने पत्रकार दिनाच्या अनुषंगाने पत्रकारांचा सन्मान प्राचार्य सचिन जद सर यांच्या हस्ते करण्यात आला.
या अॅकॅडमी मध्ये अनेक उपक्रम विद्यार्थ्यांना सर्वांग सुंदर करण्यासाठी राबविले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी संगीत व त्यांची साधने उदा. हार्मोनियम, तबला, ढोलकी, ड्रम आदी साधने उपलब्ध करून विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले जात आहेत.
क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी तरबेज व्हावेत, यासाठी व्हॉली बॉल, फुटबॉल, मॅटकुस्ती, मातीतील कुस्ती, अशी अनेक क्रीडा क्षेत्रातील साधने आणि प्रशिक्षक यांच्याकडून इथे विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. याच बरोबर , मल्ल खांब, चित्रकला , मर्दानी खेळ, त्यांचे साहित्य देखील इथं उपलब्ध करून दिले आहेत.
एकंदरीत इथं येणारा विद्यार्थी सर्वच क्षेत्रात परिपूर्ण झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने प्रगतीचे पंख देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून घडत आहे.असे मत प्राचार्य सचिन जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.