प्राधान्य क्रम शिधापात्र धारकांकडून हमीपत्र घेण्यास स्थगिती : श्री गामाजी ठमके कोल्हापुर संघटना उपाध्यक्ष
बांबवडे : प्राधान्य क्रम शिधापत्रिका ग्राहकांकडून जे हमीपत्र घेण्याची मोहीम फेब्रुवारी पासून शासनाने राबवून अपात्र शिधापत्र धारकाची शोध मोहीमेला पुढील आदेशापर्यंत शासनाने स्थगिती दिली आहे. कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने शासनाने दिलेली स्थगिती हे संघटनेचे यश आहे, असेही गामाजी ठमके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

अपात्र शिधापात्र धारक शोध मोहिमेच्या अभियानात रेशन धारकांवर जाचक अटी लादल्या होत्या. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने याला पहिल्यापासून विरोध केला होता. कारण त्यांनी रेशन व्यवस्थाच मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी सुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने दिलेली स्थगिती म्हणजे आपल्या मागणीला आलेले अंशात: यश म्हणावयास हरकत नाही. असेही उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी सांगितले.