प्रा. डॉ. एन.डी.पाटील महाविद्यालय मलकापूर- पेरीड इथं प्रवेश सुरु – डॉ.नामदेव आडनाईक सर
मलकापूर प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन.डी.पाटील महाविद्यालय मलकापूर- पेरीड तालुका शाहुवाडी इथं १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

दरम्यान यावेळी महाविद्यालयात B.A., B.COM., BSC. भाग १ प्रवेश सुरु झाले असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी N.S.S., N.C.C. , तसेच कौशल्याधारित कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत.

निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध आहेत. तेंव्हा विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालय चे उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक यांनी केले आहे.
