प्रा. डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : दसरा हा आपट्याची पाने, सोनं म्हणून वाटून शुभेच्छा देत साजरा करतात. परंतु प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड तालुका शाहुवाडी इथं पर्यावरण पूरक आपट्याची पानं वाटून दसरा सण साजरा करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला.

पूर्वी आपट्याची पाने वाटून शुभेच्छा देत साजरा करतात. त्यासाठी अनेक झाडांची कत्तल केली जाते. याचबरोबर त्यांचे भाऊबंद असणारे कांचन, सुवर्ण कांचन, कंचनर झाडांची बेसुमार कत्तल हा सण साजरा केला जात आहे. परंतु प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड तालुका शाहुवाडी इथं वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. मकरंद ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे दसरा सण साजरा करण्यात आला. टाकाऊ कागदांपासून उदा. लग्नपत्रिका, कॅलेंडर ची पाने, रद्दी पेपर, इ.पासून आपट्यांच्या पानांच्या आकाराची पर्यावरण पूरक पानं तयार केली जातात. हि पानं रंगवली जातात. काही पानांना पालक, हळद यासारख्या वनस्पतींचे रंग वापरले जातात.

पर्यावरण , प्लास्टिक निर्मुलन, पाणी, वृक्ष संवर्धन, आणि स्त्री भृणहत्या याविषयी जागरुकता यासारखे संदेश ,तथा चित्रे काढून, हि पानं सजवून आकर्षक बनवतात. पर्यावरणाचा व वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी पानं महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच इतर विद्यार्थ्यांना वाटली जातात. ” आला आला दसरा, पानं तोडणं विसरा “, ” कडीपत्ता कडीपत्ता, प्लास्टिक करा बेपत्ता “, ” सेव्ह ट्री, सेव्ह लाईफ “, ” झाडांना नका करू नष्ट, श्वास घ्यायला होईल कष्ट ” , स्वच्छता, लेक वाचवा, पाणी वाचवा, से नो प्लास्टिक, पृथ्वीला वाचवा, स्वत:ला वाचवा, असे संदेश व कविता पानांवर लिहिल्या आहेत. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांचे सतत प्रोत्साहन मिळते.

यावर्षी दसऱ्याचे औचित्य साधून, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध आकाराची लहान मोठी अशी अनेक पानं बनविली होती. यातील काही निवडक आकर्षक पानांचं दि.४ ऑक्टोबर रोजी भरविण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एन.एस. आडनाईक, नॅक समन्वयक डॉ.एस.बी.पोरे, डॉ.एम.एन. मोळे, श्री. आर.व्ही. मोरे, व्ही.एस. थोरात, डॉ.एन.के. कांबळे, तसेच विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.