फटाके लावून मलकापूर भाजप ने केले विधान परिषद विजयी उमेदवारांचे अभिनंदन
मलकापूर प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा मलकापूर तालुका शाहुवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून विजय साजरा करण्यात आला.

विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर (२९ ), श्रीकांत भारतीय ( ३० ), राम शिंदे (३० ), उमा खापरे ( २७ ), प्रसाद लाड (२८ ) अशी विजयी उमेदवारांची नावे व कंसात त्यांना मिळालेली मते आहेत.

मलकापूर मध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, भाजप चे नगरसेवक विकास देशमाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, उदयसिंह कोकरे-देसाई , रमेश पडवळ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.