फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना, आम्हाला विशेष आनंद प्राप्त होतो. कारण याठिकाणी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. असे उद्गार विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मनीषा देवी नाईक वहिनीसाहेब यांनी काढले.
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर यशवंत नगर चिखली तालुका शिराळा इथं विविध गुणवत्ता सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
यावेळी स्व.आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय च्या प्राध्यापिका सौ. अंकिता देवी नाईक या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खबाले वाय.व्ही. सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर गोवा इथ झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतून नेपाळ याठिकाणी जाण्यासाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम कुमारी पृथ्वी युवराज माने, द्वितीय श्लोक विभूते, तृतीय तनिष्क सतीश कांबळे, कुमारी समीक्षा संतोष माळी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याचबरोबर इयत्ता आठवी च्या एन.एम.एम.एस. परीक्षेत कुमारी श्रेया गायकवाड, अपेक्षा पाटील, प्रतीक्षा गायकवाड यांनी चांगले गुण प्राप्त करून गुणवत्ता धारक यादी मध्ये स्थान पटकाविले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पहिली ते चौथी, सहावी, सातवी, या वर्गांसाठी बाह्य परीक्षा मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चांगली तयारी करून घेतली जाते. तसेच पाचवी, आठवी ची स्कॉलरशिप ची तयारी व्हावी, यासाठी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षेचा अभ्यासक्रम देखील राबविला जातो. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय शाळेतील विद्यार्थी जिल्हा , केंद्र यादी मध्ये गुणवत्ताधारक झाले असून, यशोमंदिराचा कळस होण्याचा मान त्या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.
त्यापैकी वर्गवार विद्यार्थी खालील प्रमाणे – ज्ञानदा कांबळे इयत्ता पहिली तालुक्यात प्रथम, आराध्या मगदूम इयत्ता पहिली तालुक्यात द्वितीय, मृणाल पाटील, समर्थ साळुंखे इयत्ता पहिली केंद्रात तृतीय,. इयत्ता दुसरी ज्ञानदा तळेकर तालुक्यात प्रथम, वेदांत कांबळे, शिवेंद्र देसाई तालुक्यात द्वितीय. इयत्ता तिसरी योगीराज भाकरे केंद्रात चतुर्थ, शुभम पाटील केंद्रात पाचवा. इयत्ता चौथी सिद्धेश गायकवाड केंद्रात तिसरा, शिवतेज यादव केंद्रात चौथा, श्रेया चिखलकर केंद्रात पाचवी, सिद्धी सोरटे केंद्रात सहावी, आयुष पाटील केंद्रात सातवा. इयत्ता सहावी समर्थ चौगुले केंद्रात प्रथम, आर्यन सुंबे केंद्रात द्वितीय, शिवराज पाटील केंद्रात तृतीय, सचिन रेडेकर, प्रज्वल नाईक केंद्रात चौथे, प्रणव सुंबे केंद्रात पाचवा, योगीराज बच्चे केंद्रात सहावा. इयत्ता सातवी प्रसाद तळेकर केंद्रात द्वितीय, नीरज कुरणे केंद्रात तृतीय, आफनान सुतार केंद्रात सहावा, सुर्ष्टी पाटील केंद्रात सातवी या सर्व विद्यार्थ्यांचा मानाचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेची विद्यार्थिनी प्रतीक्षा गायकवाड, पालक सतीश कांबळे मंगले यांनी मनोगते व्यक्त केलीत. यामध्ये त्यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर स्वप्नाली कांबळे मॅडम, शोभाताई भोसले मॅडम, यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. गवळी यांनी वर्षभर शिक्षकांचे, पालकांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी भरपूर सराव, अभ्यास करून जिल्हा आणि राज्य स्तरावर यश प्राप्त केले, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार सौ मंगल शिराळकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भारती दिवे मॅडम यांनी केले.