educationalसामाजिक

फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ वी पुण्यतिथीदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त त्याच्या प्रतीमेला अभिवादन करण्यात आले.


प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डी.पी.गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.


तसेच त्यांनी आपल्या मनोगतातुन डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्वप्नाली कांबळे मॅडम यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जनरल नॉलेज च्या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री युवराज खबाले यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!