फसवणूक केलेल्या निर्णयाची स्वाभिमानी संघटनेकडून होळी
बांबवडे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या धर्तीवर नुकसानभरपाई देण्याचे महाविकास आघाडी च्यावतीने कबुल करण्यात आले होते. तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी रक्कम जमा करून, पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. म्हणूनच कमी नुकसान भरपाई देण्याच्या शासनाच्या परिपत्रकाची स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने होळी करण्यात आली. हे आंदोलन बांबवडे येथील एसटी स्थानक परिसरात करण्यात आले.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ९५० रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संघटनेशी झालेल्या चर्चेत कबुल केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ १३५ रुपये जमा करण्यात आले. शासनाने शेतकऱ्यांची केलेली हि शुद्ध फसवणूक असून, याच्या निषेधार्थ सदर च्या निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

दरम्यान उत्तरप्रदेश मध्ये शेतकरी आंदोलकांच्या अंगावर एका मंत्र्याच्या पुत्राने जीप घातली. या दुर्घटनेत ९ शेतकऱ्यांचा बळी गेला. याचादेखील याठिकाणी निषेध करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, जयसिंग पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष अवधूत जानकर, रामभाऊ लाड, रायसिंग पाटील, अजित साळोखे, गुरुनाथ शिंदे, अमर पाटील, अनिल पाटील, शामराव मिस्त्री, भीमराव नांगरे, पांडुरंग लाड, शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील, राजाराम मगदूम, आबा निकम, बाबा लाड, काळू पाटील, भैय्या थोरात, पांडुरंग पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.