बँकेचा होणारा राजकीय अड्डा थांबवण्यासाठी ” परिवर्तन आघाडी “- मा.आम. सत्यजित पाटील आबा
बांबवडे : आजपर्यंत शेतकऱ्यांनी केवळ नेत्यांची भाषणेच ऐकायची, असा शिरस्ता जिल्हा बँकेच्या अनुषंगाने समोर येत आहे. शेतकऱ्याला या बँकेच्या प्रक्रियेपासून दूरच ठेवले जात आहे. जो शेतकरी या बँकेचा कणा आहे, तो मात्र या बँकेच्या निवड प्रक्रियेतून बाहेर राहतोय, यासाठीच हि परिवर्तन आघाडी निर्माण करण्यात आली असून, इथं खऱ्या अर्थाने निष्ठावंतांना संधी देत आहोत, म्हणूनच या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी निवडून येणे, हि काळाची गरज आहे, यासाठी परिवर्तन आघाडीच्या शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून आघाडीला मतदान करावे, असे मत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांनी व्यक्त केले.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ज्ञानराजा मंगल कार्यालय इथं शिवसेना ,शेकाप, रिपाई ,या गटांनी एकत्र येत, हि राजर्षी शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडी २०२१-२०२२ निर्माण केली. याच आघाडीचा मेळावा बांबवडे इथं संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सत्यजित पाटील आबा उपस्थित होते. यावेळी अनेक मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.

यावेळी बोलताना माजी आमदार सत्यजित आबा पुढे म्हणाले कि, जेंव्हा सर्वसामान्य शेतकरी पेटून उठतो, तिथे परिवर्तन निश्चित घडत असते. या बँकेच्या निवडणुकीत आम्हाला केवळ गृहीत धरले गेले. फक्त एक जागा अधिक मागितली, तरी सत्ताधाऱ्यांनी दिली नाही. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी रहात आली आहे. जर खऱ्या अर्थाने निष्ठावंतांना संधी द्यावयाची असेल, तर परिवर्तन घडले पाहिजे. यासाठी शिवसेनेचे सर्वच आमदार आपली सर्व ताकद या आघाडीच्या पाठीशी उभी करणार आहेत. या निवडणुकीत केवळ राजकीय सोय करण्याचा हा प्रयत्न असून, राजकारणाचा अड्डा जिल्हा मध्यवर्ती बँकेला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु त्यांचे हे मनसुबे आम्ही घडू देणार नसून या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे. करणा निष्ठावंतांचा आम्हाला पाठींबा आहे.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले कि, सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जिल्हाभर पळवले. नेता अशा व्यक्तीला म्हणावे , जो नेता आपल्या कार्यकर्त्याला या तीरावरून त्या तीरावर नेतो, त्यालाच नेता म्हणावे. आणि आमच्या शिवसेनेचा केवळ वापर करून घेतला. म्हणूनच अशा सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या परिवर्तन आघाडीला निवडून आणावे.

यावेळी उमेदवार विश्वास जाधव, अॅड. विजयसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, नामदेव गिरी आदी वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी केले.
यावेळी शेकाप चे भाई भारत पाटील, माजी जि.प.स. एन.डी. पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील, माजी सभापती विजयराव खोत, अमरसिंह पाटील, विजय लाटकर,संदीप पाटील सुपात्रे, भालेकर मॅडम, रिपाई चे उत्तम कांबळे आदी कार्यकर्ते, तसेच ठराव धारक यावेळी उपस्थित होते.