बजागेवाडी येथील आदर्श सेवा तरुण मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथील आदर्श सेवा तरुण मंडळ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव संपन्न झाला. गेली दोन वर्षे कोरोना च्या महामारी मुळे कोणतेही सण सार्वजनिक रित्या साजरे करता आले नव्हते. यंदा ती परिस्थिती बदलली असून, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या अनुषंगाने बजागेवाडी येथील आदर्श सेवा तरुण मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रम संपन्न करण्यात आले. यामध्ये विविध पारंपारिक स्पर्धा, रक्तदान शिबीर, विविध विषयांवर व्याख्याने संपन्न झाले. या व्याख्यानांमध्ये ” गडकोट किल्ल्यांचे संवर्धन ” या विषयावर संदीप जाधव सर यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रबोधन केले. तसेच डॉ. शंकर बजागा यांनी ” १० वी नंतर पुढे काय ? ” या विषयावर संबोधित केले.

दि. ८ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करून, समाजाप्रती आपले कर्तव्य निभावले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

आदर्श सेवा तरुण मंडळ बजागेवाडी यांनी मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने विधायक कामे करून समाजसेवेचा नवा पायंडा पाडला आहे. ज्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून समाजाची सेवा होईल.