बजागे वाडी फाट्याजवळ वळणावर दुचाकीचा अपघात : दोन तरुण ठार
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी फाट्याजवळ असलेल्या वळणावर दुचाकी घसरून आज दि.८ मे रोजी दुपारी तीन वाजनेच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण ठार झाले असल्याचे समजते.

बजागेवाडी फाट्याजवळ असलेल्या वळणावर एक दुचाकी पल्सर क्र. MH-09-DR-2210 घसरल्याने अपघात झाला. हे दोघेही मलकापूर दिशेला निघाले होते. ह्या दुचाकी पल्सर वरून ऋतुराज सुनील कुंभार वय २७ वर्षे राहणार बोरपाडळे तालुका पन्हाळा ,तसेच ओकोली तालुका शाहुवाडी येथील युवराज पांडुरंग कुंभार वय ३६ हे दोन्ही युवक या अपघातात ठार झाले आहेत.

अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.