सामाजिक

बांबवडेत संयुक्त शिवजयंती सोहळा नांदतोय …:३९४ वा शिवजयंती सोहळा

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ३९४ वा संयुक्त शिवजयंती सोहळा बांबवडे एसटी स्थानकाजवळ संपन्न होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. यावेळी माजी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील यांच्यासह शिवसेनेच्या अलका भालेकर, बांबवडे महिला शहरप्रमुख व समस्त शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.


शिवजयंती च्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. आज रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. संध्या. ५.०० वा. स्लो बाईक स्पर्धा संपन्न होणार आहेत. तसेच संध्याकाळी ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स स्पर्धा संपन्न होणार आहेत. बुधवार दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. गाडीमागून श्वान स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी ७.००वा. खेळ रंगला पैठणीचा ( होम मिनिस्टर ) स्पर्धा होणार आहेत. गुरुवार दि..२२.फ़ेब्रुवरि२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वा. हलगी वादन स्पर्धा संपन्न होणार आहेत. शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० व. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. यासाठी बक्षिसे श्री आनंदा तोडकर, श्री दत्तात्रय बंडगर, कु. मुग्धा प्रभाकर कांबळे, श्री जयवंत पाटील पिशवी, माजी उपसरपंच श्री स्वप्नील घोडे-पाटील, श्री वैभव नारकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिग्विजय पाटील, श्री. सनी पाथरवट, बेंगलोर बेकारी, श्री. रवींद्र पाटील थेरगावकर, श्री. सागर निकम, श्री दिग्विजय दीपक पाटील, श्री विजय जयवंत कांबळे, श्री प्रवीण जानकर, श्री अविनाश गावडे, श्री महेश बंडगर, कै. कर्णसिंह घुंगुरकर स्मरणार्थ, श्री अभयसिंह बाळासाहेब चौगुले माजी ग्रा.सदस्य, श्री सागर चौगुले, श्री. स्वप्नील लाड, कै. भरत बापू निकम यांच्या स्मरणार्थ, शिराळकर उद्योग समूह, माजी उपसरपंच सयाजी निकम, श्री. सुहास निकम आदी देणगीदारांनी बक्षिसे जाहीर केली आहेत.


यासाठी विशेष सहकार्य जी.प.स. श्री विजयराव बोरगे पैलवान, श्री. सागर कांबळे माजी सरपंच, श्री. नामदेव गिरी, श्री. सुहास कोल्हापुरे, श्री चंद्रप्रकाश खुटाळे, श्री अमर चौगुले, श्री सनी पाटील, श्री. सौरभ खुटाळे, आदी मंडळींनी विशेष सहकार्य केले आहे.

 

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!