बांबवडे आरोग्य केंद्रात लवकरच शीत शवपेटी उपलब्ध :जि.प.स. विजयराव बोरगे
बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शीत शवपेटी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती, येथील जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले कि, तालुक्यात दोन शीत शव पेटी उपलब्ध करण्यात आल्या असून, एक बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आली तर, एक सरूड जि.प.सदस्य हंबीरराव पाटील (बापू ) यांच्या भेडसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी जि.प.सदस्य हंबीरराव पाटील (बापू ) यांचे देखील प्रयत्न आहेत.
आपला दुर्गम तालुका असून, बहुतांश कुटुंबातील कर्तेपुरुष पुणे-मुंबई सारख्या शहरात नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. त्यांचे आई-वडील गावाकडे राहतात,अशा मंडळींसाठी याचा उपयोग होणार आहे. अशीही माहिती श्री बोरगे यांनी दिली.