बांबवडे आरोग्य केंद्राबाहेर वैद्यकीय कचरा :आंदोलनाचा इशारा
बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंपाउंड बाहेरील भिंतीनाजिक वैद्यकीय कचरा आढळत असल्याची तक्रार जनमानसातून होत आहे.
बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे कामाच्या बाबतीत नावाजलेले आरोग्य केंद्र असूनही, या आरोग्य केंद्राच्या कंपाऊंड च्या भिंती नजीक वैद्यकीय कचरा नेहमीच आढळून येतो. हा कचरा अर्धवट जळालेला असतो, तर कधी त्याची विल्हेवाट लावलेली नसते. बाहेर जनावरे चरण्यासाठी येत असतात, तर कधी नागरिकांना सुद्धा त्याचा अपाय होण्याचा धोका नाकारता येत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. याबाबत लोकप्रतिनिधीना कळवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाही तक्रारी स्थानिक लोकांकडून ऐकावयास मिळत आहेत. याबाबत त्वरित लक्ष घालून या वैद्यकीय कचऱ्याची नीट विल्हेवाट लावावी,अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा स्थानिक लोकांकडून देण्यात येत आहे. तेंव्हा वरिष्ठ अधिकारी , पदाधिकारी, ग्रामपंचायत संचालक मंडळ यांनी सुद्धा याची दाखल घ्यावी.