educationalसामाजिक

बांबवडे इथं अद्ययावत स्व.पै. महिपती बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु


बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्व.पै. महिपती बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकादि. ६ नोव्हेंबर पासून श्री सुभाषराव बोरगे यांच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.


या अभ्यासिकेचे वैशिष्ठ्य म्हणजे इथं असलेली प्रशस्त बैठक व्यवस्था, शांततामय वातावरण, मुलामुलींची स्वतंत्र बैठक व्यवस्था, पुस्तकांची उपलब्धता, आवश्यक ती वर्तमानपत्रे, साप्ताहिके, योग्य मार्गदर्शन, आणि माफक फी , हि अभ्यासिकेची वैशिष्ठ्ये असून, सीसी टीव्ही कॅमेरांचे विद्यार्थ्यांवर असणारे सतत लक्ष . या सर्व सोयींमुळे हि अभ्यासिका अद्यावत सज्ज झाली आहे.


आपले विद्यार्थी कष्ट करतात, त्यांच्याकडे चिकाटी आणि सातत्य याचबरोबर योग्य वातावरण आणि पुस्तकांची उपलब्धता झाली कि, आपला विद्यार्थी यशापासून दूर राहणार नाही, असे मत अभ्यासिकेचे मालक श्री सुभाषराव बोरगे सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


अधिक माहिती साठी ९९२२४१६०५३, ८४३२२९६३६३, ७४९८०००३२९, ८४०६४८१९४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील श्री बोरगे सर यांनी केले आहे.
हि अभ्यासिका , जिल्हा शेतकरी संघ शेजारी जय – उदय अपार्टमेंट , बांबवडे इथं सुरु करण्यात आली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!