बांबवडे इथं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
बांबवडे : शाहुवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने बांबवडे इथं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा आणि प्रेम करणारी माणसं आजही शाहुवाडी तालुक्यात आहेत. त्यांचा वसा आणि वारसा चालवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असणारी आमची निष्ठा सदैव अबाधित राहील. असे वक्तव्य उप तालुकाप्रमुख विजय लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले. यावेळी शहर प्रमुख सचिन मूडशिंगकर, उप शहरप्रमुख विक्रम काळे, समीर शिकलगार, वैभव चव्हाण , रोहन लांडगे, प्रदीप निकम, अविनाश गावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.