बांबवडे इथं केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
बांबवडे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, हे निषेधार्ह आहे. अशी बेताल वक्तव्य भविष्यात सहन केली जाणार नाही. असे उद्गार शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना काढले.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं सकाळी ११.०० वाजता केंद्रीय मंत्री .नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आणि नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख, महिला उपजिल्हाप्रमुख दीप्ती कोळेकर, बळीराम ठाणेकर, योगेश कुलकर्णी, विजय लाटकर, सचिन मुडशिंगकर, तुषार पाटील, महिला आघाडी च्या नेत्या अलकाताई भालेकर, सुवर्णा दाभोळकर, आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.