सामाजिक

बांबवडे इथं राष्ट्रीय महामार्गावरच झालाय ” स्विमिंग पूल ” ?


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं चौगुले पेट्रोल पंप जवळ राष्ट्रीय महामार्ग विभागाने मोफत स्विमिंग पूल निर्माण केले असून, अनेक ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा ,एवढंच लिहायचं बाकी ठेवलंय. कारण प्रतिवर्षी पावसाळा सुरु झाला कि, या पेट्रोल पंप जवळ मुख्य महामार्गावर पाणी साचते. आणि कोणी नको म्हटलं तरी येणारी – जाणारी वाहने पादचाऱ्यांना अक्षरश: न्हाऊ घालतात. या परिस्थितीचा हे विभाग कधीच विचार करीत नाहीत. यंदा मात्र या गोष्टीवर उपाय झाला नाही तर बांबवडे ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या माध्यमातून या विभागाला दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशीच चर्चा ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत आहेत.


बांबवडे येथील चौगुले पेट्रोल पंप जवळ पावसाळ्यात प्रतिवर्षी पाणी साचते. यातून वाहनाची सतत वर्दळ असते. प्रत्येकजण आपल्याला पाण्यातून जायला नको, म्हणून उलट दिशेने वाहन चालवून पाण्याचा भाग वाचवायला बघतो. परंतु चुकीच्या दिशेने गेल्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघात देखील इथं घडले आहेत. पावसाळ्यात इथं पूर्ण रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे नक्की रस्ता कुठे आहे, हे वाहनचालकाला शोधावे लागते.


हि परीस्थिती संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत असते, तरीही या विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदा मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास, ग्रामस्थांचा रोष या महामार्ग विभागाला पहावयास मिळेल, अशीच चर्चा गावभर सुरु आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!