सामाजिक

बांबवडे गावाच्या तरुण व्यावसायिकांना बांबवडे च्या दुकान गाळ्यात जागा मिळावी.-तरुण व्यावसायिक


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील तरुण व्यावसायिकांना गावातच व्यवसाय करण्यास जागा मिळावी, अशी मागणी तरुणाईतून होत आहे.


बांबवडे इथं बांधले गेलेले दुकानगाळे , हे गावकऱ्यांपेक्षा इतर गावकऱ्यांनाच अधिक प्रमाणात मिळाले गेले आहेत. त्यामुळे इथल्या तरुणाई ला व्यवसायासाठी जागा मिळालेली नाही. तरुण इतर भानगडी पेक्षा व्यवसाय करू पहात आहे, हि महत्वाची बाब आहे. तरुणाईला योग्य दिशा देणे, हि काळाची गरज आहे. अशावेळी इथं बांधले गेलेले दुकानगाळे इथल्या तरुणांना मिळणे, हि काळाची गरज होती. परंतु कागदी घोडे नाचवून,त्यांना या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले गेले, अशी तरुणाई ची कुरबुर आहे.


भविष्यात या तरुणाईला गावातच स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी देखील तरुण व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!