बांबवडे ग्रामपंचायत ने ७९ वा स्वातंत्र्यदिन सन्मानाने साजरा केला
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हि एक मोठी बाजारपेठ आहे. गेली दोन वर्षे येथील महादेव ग्रामविकास आघाडी चे सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी आपल्या मानाचा त्याग करून या काळात ध्वजारोहणाचा मान त्यांनी सर्व सामान्य जनतेला दिला आहे. हा आगळा वेगळा पायंडा बांबवडे ग्रामपंचायत ने पाडून त्यागाची किमत दाखवून दिली आहे.
मानपान सोडून त्यांनी सुरुवातीला ग्रामपंचायत शिपाई महादेव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान दिला. त्यानंतर एका शेतकरी राजाला त्यांनी हा ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर माजी सैनिकच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावर्षी तर निवृत्त आंगणवाडी सेविका आक्काताई सुतार यांच्याहस्ते ध्वजारोहण करून एक नवा आदर्श त्यांनी सगळ्यांसमोर ठेवला.
याचबरोबर त्यांनी महात्मा गांधी विद्यालय चे ध्वजारोहण एका पत्रकाराच्या हस्ते केला. ते पत्रकार म्हणजे शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार होत. मुकुंद पवार यांनी पत्रकारितेत ३० वर्षे काम केले असून,आज त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून ध्वजारोहणाचा मान दिला . यासाठी ग्रामपंचायत बांबवडे सरपंच, उपसरपंच , संचालक मंडळ, तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांचे मुकुंद पवार यांनी मनापासून आभार मानले.
सर्व प्रथम बांबवडे केंद्र शाळेचे ध्वजारोहण गावचे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती च्या स्वाती पाटील यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन केले. महात्मा गांधी विद्यालयाचे ध्वजारोहण साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत बांबवडे चे ध्वजारोहण निवृत्त आंगणवाडी सेविका आक्काताई सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बांबवडे गावचे ग्राम महसूल अधिकारी व जलतरणपटू श्री गगन देशमुख च्या उच्च कामगिरी साठी त्यांचा ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच आणि संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. याच बरोबर बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका गौरी कारखानीस यांचा देखील सत्कार करण्यात आला.त्यांना फ्लोरेंस नाईटी ग्लेझ पुरस्कार जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात आला. त्यांना राज्यस्तरावर द्वितीय,तसेच जिल्हा स्तरावर द्वितीय तर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी कामावर ठेवलेली श्रद्धा हेच यातून दिसून येत आहे. बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात २०२४-२५ या वर्षात १६९ प्रसूती पैकी १०४ प्रसूती त्यांनी स्वपरिश्रमाने केल्या आहेत. यास्तव ग्रामपंचायत बांबवडे ने त्यांचा सन्मान करून त्यंच्या कामाची पोच पावती दिली आहे. ग्रामपंचायत हे स्तुत्य उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहेत.