सामाजिक

बांबवडे ची आरोग्य यंत्रणा रामभरोसे : बांबवडे शंभर टक्के सुरु,लॉकडाऊन चा विसर

बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी इथं शंभर टक्के दुकाने उघडली गेली असून, यामुळे व्यापारी वर्ग खुशीत आहे. परंतु लॉकडाऊन चा काळ १७ मे पर्यंत असल्याचा विसर व्यापाऱ्यांसह नागरिकांनादेखील पडला असल्याचे दिसत आहे. यात सोशल डीस्टंसिंग चे तीन तेरा वाजले आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे बांबवडे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

बांबवडे ग्रामपंचायत कोरोना समिती ने १० मे पर्यंत बांबवडे शंभर टक्के बंद चे आवाहन केले होते. यास व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली होती. दरम्यान काही मंडळी नाराज सुद्धा होती. पण सर्वसामान्य व्यापारी ग्रामपंचायत सोबत होता. त्यानंतर आज दि. ११मे रोजी मात्र बांबवडे येथील व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने उघडली असून, यामुळे बांबवडे ला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा खुलेआम डोळेझाक केल्याचे दिसून आले. हि मंडळी चौकीसमोरील तंबूत मोबाईलवर गर्क असल्याचे दिसून आले.

दरम्यान या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बांबवडे चे आरोग्य आत्ता रामभरोसे झाले आहे.यातच बाहेरगावाहून गावी येत असल्याने, यात काही पॉझीटीव्ह निघाल्यास येथील पंचक्रोशी ला कोरोना चा जोरदार झटका बसला तर, आश्चर्य वाटता कामा नये.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!