बांबवडे च्या ग्रामसभेत प्लास्टिक बंदीसाठी विविध योजना -सरपंच भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं महादेव मंदिरात विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी प्लास्टिक बंदी संदर्भात विशेष आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्लास्टिक गोळा करून देणाऱ्या बचत गटांना विशेष बक्षीस योजना घोषित करण्यात आली आहे.याबद्दल विशेष माहिती लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी आपल्या मनोगतातून दिली.
बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने विशेष ग्रामसभा महादेव मंदिरात संपन्न झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले उपस्थित होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून शाहुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मंगेश कुन्चेवार उपस्थित होते.
या बैठकीत बांबवडे तालुका शाहुवाडी अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २) प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना,३) १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ हा सेवा साजरा पंधरवडा करणेबाबत, ४) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत बांबवडे गावातील लाभार्थी निवडणे आदी विषय या बैठकीत मांडण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच भगतसिंग चौगुले पुढे म्हणाले कि, ग्रामपंचायत कडे प्लास्टिक विघटन करण्यासाठी मशीन उपलब्ध आहे. प्लास्टिक चे संपूर्ण उच्चाटन करायचे आहे. त्यासाठी गावात प्लास्टिक बंदी आणण्यासाठी महिला बचत गटांसाठी विविध बक्षीस योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून महिला बचत गटांनी या राष्ट्रीय अभियानात आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन देखील सरपंच चौगुले यांनी केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री हेरवाडे , ग्रामपंचायत अधिकारी हेमंत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने काम पहिले. ग्रामपंचायत चे उपसरपंच सर्वश्री सुरेश नारकर, स्वप्नील घोडे पाटील, दीपक निकम, विद्यानंद यादव, दिग्विजय पाटील, मनीषा पाटील, वंदना बंडगर, कविता प्रभावळे, सुनीता कांबळे, शोभा निकम,सविता निकम, या सदस्यांसोबत दीपक पाटील, शरद निकम, अमर निकम, दिलीप बंडगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.