बांबवडे च्या महाराष्ट्र बँके चा ज्येष्ठ नागरिकाचा बेरर चेक वठविण्यास नकार : अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र ने तर आत्ता असुविधांची हद्द केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने एका ज्येष्ठ नागरिकांचा बेरर चेक वठविण्यास नकार दिला आहे. याबाबत रोखपाल सतीश कदम यांना विचारले असता, त्यांनी उडवा-उडवी ची उत्तरे दिली. या अनुषंगाने येथील बँक ऑफ महाराष्ट्र चा ग्राहक त्रासला असून, याठिकाणी दुसरी राष्ट्रीयकृत बँक येणे, गरजेचे आहे, अशी चर्चा बँकेच्या ग्राहक वर्गातून करण्यात येत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, येथील एक ज्येष्ठ नागरिक बँक ऑफ महाराष्ट्र चाच बेरर चेक घेवून आले असता, बांबवडे शाखेने चेक वठविण्यास नकार दिला. तो ज्या बँकेतून दिला, तिथेच वठवा,असे उडवा-उडवी चे उत्तर दिले. बेरर चेक चा अर्थ च असा असतो कि,जो हा चेक आणेल, त्याला रक्कम अदा करावी. परंतु बँकेच्या या सध्या नियमाचा विसर देखील येथील रोखपाल सतीश कदम यांना पडला. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती या ग्रामीण भागात करण्यात येवू नये, याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

ह्या बँकेत केवळ पेन्शनधारक , व्यापारी मंडळींनाच चांगली सुविधा मिळते. इथे शेतकरी, सामान्य ग्राहक मात्र कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून नाडला जात आहे. तसेच शासनाच्या अनेक योजना फक्त जुन्या व्यापाऱ्यांच्या पदरात टाकल्या जातात. नवीन युवकाला, उद्योजकाला मात्र बँकेतून बाहेर कसे काढता येईल, अशी परिस्थिती येथील कर्मचारी व अधिकारी निर्माण करतात. आज जर यांची खाती तपासली, तर कोणत्या नवीन दुकादाराला अथवा युवकाला कर्ज मिळाले आहे, हे कोणी सांगू शकणार नाही. इथं नवीन कर्ज फक्त जुन्या व्यापाऱ्याला अथवा मोठ्या व्यापाऱ्याची शिफारस घेवून येणाऱ्याला च मिळते. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र च्या बांबवडे शाखेचा गरजू ग्राहकाला कधीही उपयोग झाल्याचे अवगत नाही. इथं लाळघोटेपणा करणारा, आणि व्यापाऱ्याची शिफारस आणणाऱ्या ग्राहकांना च कर्ज पुरवठा केला जातो.

यामुळे बांबवडे हे गाव सुमारे ५० ते ६० गावांना जोडणारे गाव आहे. इथं व्यापाराची उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. अशाठिकाणी नवीन स्टेट बँक ऑफ इंडिया, अथवा बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांनी येणं हि काळाची गरज आहे. तसेच मोठ्या खाजगी बँकांना सुद्धा व्यापाराची मोठ्या प्रमाणावर इथं संधी आहे.