बांबवडे च्या मातीला कर्तुत्वाचा गंध : डॉ.शुभम सिंघण
बांबवडे : बांबवडे च्या मातीत विकासाच्या पुष्पाला कर्तुत्वाचा गंध प्राप्त झाला आहे. शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे सारख्या गावातून आपले कर्तुत्व सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. शुभम पुष्पलता विकास सिंघण हे होय. कर्तुत्व करण्यासाठी मोठी शाळा, मोठे कॉलेज, चांगला परिसर असावा लागतो, असे नव्हे तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या शाळेत शिकून सुद्धा डॉक्टर सारखी पदवी मिळवणे शक्य आहे. हे डॉ. शुभम सिंघण यांनी आपल्या कर्तुत्वातून सिद्ध केले आहे. याबद्दल सा. शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज परिवाराच्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.
शुभम यांचे शिक्षण बांबवडे येथील जिल्हा परिषद च्या शाळेत झाले. तसेच माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे इथं झाले आहे. पुढील शिक्षण डॉ. जयंत पाटील अकॅडमी कोडोली इथं झाल आहे. 
एक काळ असा होता कि, डॉक्ट, इंजिनिअर सारख्या पदव्या मिळवण्यासाठी श्रीमंत वर्गातील विद्यार्थीच असावे लागतात. परंतु शुभम यांनी आपल्या कर्तुत्वातून, अभ्यासातून एम.बी.बी.एस. सारखी पदवी जॉर्जिया सारख्या परदेशात जावून मिळवली आहे. शुभम हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांच्या आई जिल्हापरिषद च्या आरोग्यवर्धिनी मध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच वडील वाहनचालक आहेत. घरचे आर्थिकमान मध्यम आहे. परंतु आर्थिक परिस्थितीला न जुमानता स्वत:वर विश्वास ठेवून, आत्मविश्वास वाढविला कि, कर्तुत्वाला यशाच फुल लागू शकत, आणि त्याचा सुगंध जगभर दरवळतो, हे शुभम ने सिद्ध केले आहे.
पुष्पलता सिंघण मॅडम आणि विकासभाऊ या दोघांच्या कर्तुत्वाला फार मोठं यश लाभलं आहे. कारण कधीही वाकडा मार्ग न अवलंबिता कष्टाच्या पायवाटेने चालत जावून, ह्या दाम्पत्याने आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी अतिउच्च पदवीचे स्वप्न पाहिले, आणि ते पूर्ण देखील झालेलं आहे. आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना कष्टाचे पंख शुभम यांनी लावले, म्हणूनच आज शुभम डॉ. शुभम झाले आहेत. आणि मोठ्या समाधानाने मायदेशी परतले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांची मिरवणूक देखील काढली. पुष्पलतांच्या वेलीवर विकासाचे फुल आज सुगंधाने दरवळत आहे. हा सुगंध शुभम च्या कर्तुत्वाचा आहे. हा सुगंध सिंघण मॅडम यांनी परिचारिका पदाच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेच्या आशीर्वादाचा आहे. तर हा सुगंध विकास यांच्या वाहनचालक म्हणून गाडीत झोपून रात्र काढलेल्या कष्टाचा आहे.
पुनश्च डॉ. शुभम सिंघण यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा .
