बांबवडे च्या शिवराज पाटील यांचे फाळके पुरस्कारासाठी नामांकन : पुढील वाटचालीस शुभेच्छा
कोल्हापूर : चित्रपट सृष्टीतील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बाराव्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार व दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार २०२१ करिता ” प्यार दिवाना होता है ” या मराठी चित्रपटाची नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सुपुत्र शिवराज पाटील यांनी साकार केली आहे. श्री शिवराज पाटील यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.


या पुरस्कार सोहळ्यात २५० चित्रपटांच्या स्पर्धेतून उत्कृष्ट खलनायक अभिनेता पुरस्काराकरिता महाराष्ट्रातून नामांकन करण्यात आले आहे.

शिवराज पाटील हे नेहमीच चित्रपटातून अभिनय करीत आले आहेत. त्यांचा हा छंद व्यवसायात परावर्तीत झाला. त्यांना पहिल्यापासून अभिनयाची आवड आहे . यासाठी त्यांना त्यांची पत्नी व दोन्ही मुलांचे सहकार्य लाभले. तसेच त्यांची अभिनयाची महत्वाकांक्षा या पुरस्काराच्या नामांकनाच्या माध्यमातून अधोरेखित झाल्याचे दिसत आहे.