बांबवडे त आज गुन्हेगारी च्या घटना ?
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आज गुन्ह्याच्या दोन घटना घडल्या असल्याचे समजते.
बांबवडे येथील अंबीरा पुलाजवळ एका दुकानात सुमारे ४० गॅस सिलिंडर अनधिकृतरीत्त्या आढळून आले. असे समजते. याबाबत अद्याप कोणती कारवाई करण्यात आली, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.
बांबवडे येथील पोलीस ठाण्यासमोर कार पार्किंग वरून बाचाबाची झाली. यामध्ये टू व्हीलर पार्किंग मध्ये कार पार्किंग केल्याने पोलीस अधिकारी श्री शिरसाट यांनी यामध्ये वाहतुकीस अडथळा कलम २८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलीस उपनिरीक्षक श्री शिरसाठ यांनी दिली.
दरम्यान सरूड फाट्याजवळ एका पानपट्टी च्या दुकानात अनधिकृत गुटखा आज झालेल्या छापेमारीत आढळून आल्याचे समजते.
बांबवडे सारख्या व्यापारपेठेत अशा अनधिकृत घटना घडत आहेत. याबद्दल व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, आणि अनधिकृत साठेबाजी होवू नये, यासाठी काळजी घ्यावी.
