सामाजिक

बांबवडे त ” कोरोना ” दाखल : तालुका आरोग्य अधिकारी अनभिज्ञ

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील एक रुग्ण ” कोरोना ” ने ग्रस्त होते. त्यांचे आज निधन झाले.
छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल च्या रुग्णवाहिकेने त्यांचे शव बांबवडे येथील स्मशानभूमी त आणण्यात आले. आणि त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.
दरम्यान बांबवडे त कोरोना ने रुग्णाचा मृत्त्यू होणे, हि बाब गंभीर असून, येथील आरोग्य यंत्रणा नेमकी काय करत आहे. हा यक्ष प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
दरम्यान यबाबत शाहुवाडी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता, माझ्यापर्यंत कोणतीही माहिती नाही, असे डॉ. एच.आर. निरंकारी यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या कोरोन रुग्णाविषयी माहिती नाही, हि बाब हास्यास्पद आहे. यावरून तालुक्याचे आरोग्य किती सुरक्षित आहे, हेच यावरून दिसून येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!