बांबवडे त नाविन्यपूर्ण ” गोकुळ स्वीट अँड ड्रायफूड ” चा शुभारंभ
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं ” गोकुळ स्वीट अँड ड्रायफूड ” या नाविन्यपूर्ण मिठाई च्या दुकानाचं उद्घाटन संपन्न झालं. ऐन दिवाळी च्या शुभारंभाला सुरु होणारं, हे मिठाई चं दुकान खवैय्यांना एक पर्वणी आहे.

बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे यांच्या हस्ते या गोड दुकानाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी गावाचे सरपंच सागर कांबळे, माजी सरपंच व विद्यमान विष्णू यादव, उपसरपंच सयाजी निकम, सतत पाच वेळा निवडून आलेले सदस्य सुरेश नारकर, व संचालक मंडळ आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती दुधात साखर पडल्यासारखा हा समारंभ संपन्न झाला.

बांबवडे एसटी स्थानकासमोर असलेल्या नारकर बिल्डींग मध्ये या मिठाई च्या दुकानाचं वास्तव्य आहे. गोड पदार्थाबरोबर च इथं दर्जेदार ड्रायफूड सुद्धा उपलब्ध आहे. तर येतांय ना, या मिठाई च्या दुकानाला भेट देण्यासाठी . लवकर या. त्वरा करा, आणि दिवाळी चा शुभारंभ करा.


यावेळी पोलीस पाटील संजय कांबळे, बिल्डींग चे मालक चंद्रकांत नारकर, रामचंद्र शेळके आप्पा, स्वप्नील घोडे-पाटील, अभयसिंह चौगुले, बाळासाहेब रवंदे व ग्रामस्थ, त्याचबरोबर केंद्रीय खाद्य सुरक्षा सल्लागार समिती चे सदस्य श्री धनाराम दोलारामजी चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा भाजपा , मुंबई चे उपाध्यक्ष ध्रुवकुमार तिवारी (पत्रकार ), सिरवी समाज चे कोल्हापूर, सांगली, सातारा चे अध्यक्ष सुनिलाल लुंबाजी परमार, सिरवी समाज चे कोल्हापूर, सांगली, सातारा चे कोषाध्यक्ष भानाराम दीपाजी चौधरी, राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी संघटना पाली ( राजस्थान ) चे जिल्हाध्यक्ष वरदाराम भूराजी चौधरी, शुभम नागरी सह.पतसंस्था मुंबई चे चेअरमन राजकुमार तिवारी,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक व मालक कसाराम पोमार चौधरी हे होते.