बांबवडे त ” न्यू फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स शॉपी ” लवकरच नवे दालन
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अनेक तरुण व्यवसायाकडे वळू लागला आहे. इथं लवकरच ” न्यू फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स शॉपी ” लवकरच जनतेच्या सेवेत येत आहे. अशी माहिती संदीप शेळके व अमोल लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

एकंदरीत तरुण वर्गाने आता नोकरी च्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून आपले अर्थकारण चालविण्याचे ठरविले आहे. हि बातमी निश्चितच सुखावह आहे. कारण नोकरी च्या मागे लागताना अनेक मंडळींच्या पायी लोळण घ्यावी लागते. आणि अशा तरुणांचा वापर आपल्या सोयीच्या कामासाठी केला जातो. परंतु सध्या तरुण सुधारला आहे. आठ तास नोकरी च्या ऐवजी बारा तास व्यवसाय करणं पसंद करू लागला आहे.

म्हणूनच संदीप शेळके व अमोल लाटकर या तरुणांनी आपला मोबाईल शॉपी च्या व्यवसायात वृद्धी करून नवे इलेक्ट्रॉनिक्स चे दालन सुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ” न्यू फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स शॉपी ” नावाचे नवे दुकान बांबवडे एसटी स्टँड समोर असलेल्या ‘ कोठावळे ‘ इमारतीत लवकरच सुरु होत आहे.

यामध्ये मोबाईल्स, सोबत फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, साउंड सिस्टीम आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सुद्धा विक्रीस ठेवली जाणार आहेत. तसेच ती सुलभ हफ्त्यांवर सुद्धा उपलब्ध होणार आहेत.

यासाठी बजाज फायनान्स, टीव्हीएस फायनान्स आदी कंपनी फायनान्स साठी उपलब्ध असणार आहेत. तेंव्हा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप शेळके आणि अमोल लाटकर या दुकान मालकांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.