बांबवडे त पारंपारिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपती चे विसर्जन पारंपारिक वाद्यांच्या गजरात केले. यामध्ये येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ तसेच आदर्श मित्र मंडळ आदी मंडळांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अंमलात आणला.

येथील गणेशोत्सव अनेक बहारदार कार्यक्रमांनी गजबजलेला असतो. यामध्ये नाटक, एकांकिका, डान्स स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, मर्दानी खेळ अशा अनेक कार्यक्रमांनी येथील रस्ते फुलून गेलेले असतात. परंतु यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाने आपली जबाबदारी स्वीकारली, आणि कार्यक्रम साधेपणात साजरे केले. यावेळी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने घोड्यावर उभे राहून एक बालक हलगी वाजवत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होता.

अशा सर्वच गणेशोत्सव मंडळांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने आभार आणि अभिनंदन कारण त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पाळली.