बांबवडे त सशर्त अटींसह जीवनावश्यक दुकाने सुरु : दि.२१ एप्रिल पासून
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं दि. २१ एप्रिल पासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, शेती व्यवसाय, तसेच शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यात येतील, आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येणाऱ्या सुचनांसहित पालन करून हे व्यवहार सुरु करावेत, अशा सूचना बांबवडे ग्रामपंचायत व कोरोना समिती यांच्याद्वारे करण्यात आल्यात.
यावेळी झालेल्या बैठकीत प्रत्येक व्यावसायिकाने सोशल डीस्टंसिंग ची व्यवस्था करण्यासाठी आपल्या दुकानासमोर योग्य अंतराने गोल सिमा बनवाव्यात. या सिमेमध्येच ग्राहकाने उभे राहावे,याची दक्षता दुकानदाराने घ्यावयाची आहे. याव्यतिरिक्त ग्राहक बाहेर गर्दी करतील,तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.आणि दुकानासमोर काऊंटरवर गर्दी झाल्यास दुकानदारावर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर टॅक्टर चे स्पेअर पार्ट, ऑईल यासंदर्भाने सोशल डीस्टंसिंग पाळून व्यवहार सुरु करावेत. अशा गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, ग्रामसेवक जी.एस.कमलाकर, तलाठी नसीम मुलाणी, पोलीस पाटील संजय कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील आवळीकर, सदस्य विष्णू यादव, सुरेश नारकर, कोरोना समितीचे सदस्य,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.