बांबवडे त ” स्वाभिमानी ” चा ” चक्का जाम “
बांबवडे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर ग्रामीण भागात ४ मार्च रोजी चक्काजाम आंदोलन जाहीर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हे आंदोलन स्वाभिमानी चे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारले होते. याच अनुषंगाने शाहुवाडी तालुक्यात बांबवडे इथं रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आले. तालुक्यात बांबवडे सह मलकापूर, करंजफेण, तुरुकवाडी याठिकाणी देखील आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे सुरेश म्हाऊटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

शेतकऱ्यांना दिवसा किमान दहा तास वीज मिळावी, वीज बील कमी करावे, आदी मागण्यांसाठी आघाडी सरकारच्या विरोधात हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उर्जामंत्री नाम.नितीन राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबवडे इथं केले.

यावेळी संघटनेचे पद्मसिंह पाटील, सुरेश म्हाऊटकर, अवधूत जानकर , जयसिंग पाटील, गुरुनाथ शिंदे, महेश खुटाळे, रामभाऊ लाड, अनिल पाटील,आदी कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने फौजदार सचिन पांढरे आणि पोलीस कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.