बांबवडे त १८ ते २४ ऑगस्ट अखंड प्रयन सोहळा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं महादेव मंदिरात श्री ज्ञानेशारी ग्रंथाचे अखंड पारायण दि.१८ ऑगस्ट २०२५ ते २४ ऑगस्ट २०२५ अखेर संपन्न होत आहे . सदर च्या पारायणास ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अखंड पारायण सप्ताहात अनेक महाराजांचे कीर्तन भजन संपन्न होणार आहेत. दैनंदिन कार्यक्रम मध्ये ४ ते ६ वाजता काकड आरती, सकाळी ७.३० ते ११.०० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ गाथा भजन व हरिपाठ , सायंकाळी ६.०० ते ७.०० प्रवचन ,रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन व हरिजागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पारायण सोहळ्यात व्यासपीठ चालक ह.भ.प. गणपती परीट महाराज असणार आहेत.
सोमवार दि.१८/८/२०२५ रोजी ह.भ.प. तुकाराम खोत महाराज गमेवाडी यांचे प्रवचन ,ह.भ.प. भिकाजी मिरजकर ( वडगाव )यांचे कीर्तन, भजनी मंडळ पिशवी, सरूड, वाडीचरण, खुटाळवाडी, पोवारवाडी, बोरीवडे, तळपवाडी यांची कीर्तन साथ,व जागर.करण्यात येत आहे.
मंगळवार दि.१९/८/२०२५ रोजी ह.भ.प. नारायण साळुंखे महाराज ( राम मंदिर बांबवडे ) यांचे प्रवचन , ह.भ.प. गुरुवर्य चैतन्य महाराज वास्कर ( पंढरपूर ) यांचे कीर्तन ,, भजनी मंडळ शित्तूर तर्फ मलकापूर, शाहुवाडी, गुजरवाडी, तळपवाडी, भोसलेवाडी, भैरेवाडी, साळशी, गोगवे, आवळी.यांची कीर्तन साथ व जागर .
बुधवार दि.२०/८/२०२५ रोजी ह.भ.प. कृष्णा नाईक महाराज सरूड यांचे प्रवचन ,ह.भ.प. राम किटे महाराज गुजरवाडी यांचे कीर्तन, भजनी मंडळ मोळावडे, डोणोली, चरण, शिवारे, बजागेवाडी , भजनी मंडळ सागाव,तालुका शिराळा.यांची कीर्तन साथ व जागर.
गुरुवार दि. २१/८/२०२५ ह.भ.प. पी.एस.पाटील सर साळशी यांचे प्रवचन, ह.भ.प. दिनकर पाटील महाराज ( केर्ली ) यांचे कीर्तन , भजनी मंडळ परखंदळे, पिशवी, शिंपे, पाटणे, घुंगुर, मोळावडे, ससेगाव, गोगवे, वाडीचारण यांची कीर्तन साथ व जागर.
शुक्रवार दि.२२/८/२०२५ रोजी ह.भ.प. यशवंत माने महाराज घुंगुरवाडी यांचे प्रवचन, गुरुवर्य ह.भ.प. ऋषिकेश वास्कर ( आबा )महाराज पंढरपूर, यांचे कीर्तन , भजनी मंडळ सुपात्रे, भाडळे, वरेवाडी, सरूड, थेरगाव, भजनी मंडळ बोंगेवाडी तालुका पन्हाळा, यांची कीर्तन साथ व जागर.
शनिवार दि.२३/८/२५ रोजी ह.भ.प. संजय सुतार महाराज ( सोनवडे ) यांचे प्रवचन ,गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर वास्कर महाराज ( पंढरपूर ) यांचे कीर्तन , भजनी मंडळ सोनवडे, साळशी, घुंगुर, केळेवाडी, गमेवाडी, सावे, सावर्डे, पिशवी, सुपात्रे, सरूड यांची कीर्तन साथ व जागर..
रविवार दि.२४/८/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० वा. काल्याचे कीर्तन वसंत शिंदे- कांदेकर ( पिशवी ) , सकाळी १० ते ११ वा. दिंडी सोहळा मंदिर प्रदक्षिणा , ११ ते ३.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. या पारायण सोहळ्याचे स्फूर्तीस्थान ह.भ.प. वासुदेव कृष्ण चौगुले महाराज ( आप्पा ) आहेत .
या पारायण सोहळ्याचे आयोजन समस्थ ग्रामस्थ बांबवडे, ग्रा.पं. बांबवडे, पारायण मंडळ, देवस्थान समिती,सेवा संस्था, दुध संस्था, पतसंस्था व सर्व गणेश मंडळे बांबवडे हे आहेत. तरी सदरच्या पारायण सोहळ्यास अगत्याने उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.