बांबवडे नागरी पतसंस्थेच्या वतीने विमा सहाय्य निधी चे बाळासाहेब खुटाळे यांच्या हस्ते वितरण
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे नागरी सह.पतसंस्था मर्या. बांबवडे ,शाखा सरूड चे कर्जदार कै. लक्ष्मण ज्योती जाधव (चिंचोली ) यांचे अपघाती निधन झाल्याने, त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या वतीने अपघाती विमा सहाय्य रक्कम रु. ५,००,०००/- चा धनादेश वितरीत करण्यात आला.

बांबवडे नागरी सह. पतसंस्था , हि शाहुवाडी तालुक्याच्या अर्थकारणातील एक महत्वाची संस्था आहे. सभासदांच्या पाठबळावर गेली २२ वर्षे हि संस्था अविरत वाटचाल करीत आहे. सरूड तालुका शाहुवाडी येथील गारमेंट व्यावसायिक कै. लक्ष्मण ज्योती जाधव ( चिंचोली ) यांनी संस्थेच्या सरूड शाखेतून कर्ज घेतले होते. संस्थेच्या माध्यमातून त्यांचा विमा उतरविण्यात आला होता. नुकतेच त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसणे, स्वाभाविक होते. पण त्यांच्या निधनाची दु:खद घटना घडल्यानंतर त्या विम्याच्या सुरक्षेतून त्यांना पाच लाख रुपये इतकी रक्कम मंजूर झाली, आणि आणि त्या रकमेचा धनादेश वितरण सरूड शाखा कार्यालयात शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या वारसांना संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे , अध्यक्ष श्री चंद्रप्रकाश पाटील-खुटाळे, उपाध्यक्ष श्री आनंदराव पचकर यांच्या हस्ते करण्यात आले.

वास्तविक अशा दु:खद घटनेत सभासदांच्या पाठीशी उभे राहून, त्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहचवणे, हे संस्थेचे कर्तव्य आहे.आणि संस्थेने आपले कर्तव्य निभावले आहे.

कै. लक्षमण जाधव यांना विनम्र आदरांजली अर्पण करीत असतानाच, या रकमेचा लाभ त्यांच्या वारसांना होत आहे, याचे समाधान आहे. संस्था अशा पद्धतीने संवेदनशीलपणे सभासदांच्या सुखदुखात सहभागी होत आली आहे. आणि इथून पुढेहि राहील, असे मनोगत संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

प्रारंभी सरूड शाखेचे शाखाधिकारी श्री सागर कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . अल्लाबक्ष मुल्ला , संचालक श्री जगदीश खुटाळे, मधुकर बुवा,सरूड शाखा सल्लागार श्री सदाशिव पाटील, दादासो पाटील, सागर पाटील, प्रकाश पाटील, संजय थोरात, विमा प्रतिनिधी मधुकर खडके,तसेच जाधव कुटुंबीय व कर्मचारी उपस्थित होते.

रोखपाल माणिक किटे यांनी आभार मानले.