बांबवडे पंचक्रोशी लॉकडाऊन : विजयराव बोरगे जि.प. सदस्य
बांबवडे : संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस ने मृत्यू चे तांडव सुरु केले असून, यातून मुक्ती मिळवण्यासाठी घरी च राहणे,हाच एकमेव उपाय आहे.शाहुवाडी तालुक्यात पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सज्ज असून आपले कर्तव्य इमाने इतबारे बजावीत आहेत. अशावेळी नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोणाला कोरोना विषयी शंका असल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हापरिषद सदस्य विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी भ्रमणध्वनी वरून बोलताना केले.
दरम्यान बांबवडे आणि पंचक्रोशीतील नागरिक बऱ्यापैकी आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.