बांबवडे येथील अंबीरा ओढा पात्राबाहेर…
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा ओढ्याने आपली मजल पात्राबाहेर मारली असून, शिराळकर यांच्याजवळ असणाऱ्या डॉ. महेश पाटील यांच्या क्लिनिकपर्यंत पाणी आले आहे.
कालपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या शाहुवाडी तालुक्याला झोडपून काढले असून, बांबवडे परिसरातील पिशवी हून येणारा साळशी सुपात्रे मार्गे बांबवडे इथं येणारा अंबीरा ओढा पात्राबाहेर आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ९१ बंधारे पाण्याखाली गेले असून, आतापर्यंत पंचगंगा नदीने ३५ फुटापर्यंत पाण्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ३९ फुट इतकी आहे. एवढेदिवस ओढ दिलेल्या पावसाने अखेर आपली उणीव, कालपासून भरून काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोल्हापूर – गगनबावडा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.