बांबवडे येथील गणेश नगर मध्ये दहीहंडी संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेश नगर मध्ये ” दही हंडी ” उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

येथील गणेश नगर मधील गणेश नगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने हा ” दही हंडी ” चा कार्यक्रम संपन्न झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडली.

यावेळी गणेश नगर मधील ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष संचालक मंडळ,तसेच सभासद यावेळी उपस्थित होते.