बांबवडे येथील बेशिस्त पार्किंग मुळे एसटी बस उभी राहण्यास अडथळा -प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी हि तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असून, याठिकाणी एसटी बस उभी राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक रहात नाही. यासाठी वाहने पार्किंग ची मुख्य असुविधा होत असून, पोलीस प्रशासन, तसेच बांबवडे ग्रामपंचायत प्रशासन यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी एसटी चे अधिकारी करीत आहेत.

बांबवडे इथं एसटी स्थानकानजीक , एसटी बस उभी राहण्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती. परंतु खाजगी वाहन चालक याठिकाणी बेशिस्तपणे वाहने पार्किंग करीत असल्यामुळे, एसटी थांबण्यास, तसेच वळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशी माहिती एसटी वाहतूक नियंत्रक दिलीप गावडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली आहे.


सध्याच्या महागाई च्या काळात प्रवासासाठी एसटी बस हे मुख्य साधन बनले आहे. कारण दिवसेंदिवस पेट्रोल, डीझेल चे दर वाढत असल्याने, सर्व सामान्य नागरिकांना खाजगी गाड्या परवडत नाहीत. यासाठी एसटी हेच प्रवासाचे मुख्य साधन झाले आहे. अशा परिस्थितीत एसटी बस साठी उभी राहण्यास, तसेच बस वळविण्यास जागा असावी,अशी प्रामुख मागणी एसटी विभागाकडून होत आहे.