बांबवडे रस्त्याचे डांबरीकरण त्वरित न झाल्यास रास्ता रोको आंदोलन – सरपंच भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा पूल ते ठमकेवाडी फाटा हा रस्ता अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे धुळीचे वातावरण संपूर्ण रस्त्यावर निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह आबालवृद्धांसह सगळ्यांनाच याचा त्रास होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित न झाल्यास १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने सरपंच भगतसिंग चौगुले व सहकारी यांनी प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले आहे.
बांबवडे गावातून कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग जात आहे. यामुळे या रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचबरोबर रत्नागिरी- सोलापूर या समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरु आहे. या कामामुळे रत्नागिरी महामार्ग अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. धुळीचे लोट सातत्याने हवेत उडत आहेत. त्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास होवू लागला आहे. लहान मुलांना देखील श्वसनाचे विकार सुरु झाले आहेत. वाहनधारकांना, दुचाकी चालकांना देखील याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे. यास्तव या मूळच्या कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गाचे त्वरित डांबरीकरण होणे, हि काळाची गरज आहे. नवीन रस्ता होतोय म्हणून या मूळच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामळे या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित व्हावे. हि विनंती . तसे न झाल्यास १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.