सामाजिक

बालदास महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन : महिला बालविकास विभाग कोल्हापूर


सरूड प्रतिनिधी : जागातिक महिला दिनाचे औचित्य साधून, महिला बालविकास विभाग कोल्हापूर, तसेच महिला समुपदेशन केंद्र, शाहुवाडी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य बालदास महाराज विद्यालय शिरगाव तालुका शाहुवाडी इथं समुपदेशन करण्यात आले.


विद्यालयातील मुलांना कायदेविषयक माहिती व निर्भया पथक याविषयी माहिती देण्यात आली. तसेच महिला समुपदेशन केंद्र याविषयी सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


निर्भया पथक याची माहिती आणि कायदेविषयक ज्ञान मुलांना असणे, हि सध्या काळाची गरज होवू लागली आहे. त्या अनुषंगाने महिला बालविकास विभाग आणि निर्भया पथक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


यावेळी महिला समुपदेशन अधिकारी श्री. विजयसिंह पाटील, सौ. सोनाली लगारे, निर्भया पथक शाहुवाडी पोलीस ठाणे च्या पाटील मॅडम, पाटील सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुतार सर, गुरव सर, व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!