बिबट्याच्या जेरबंदी साठी खासदार धैर्यशील माने यांचे वनविभागाला पत्र
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात सवते,सरूड ,भेडसगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशा आशयाचे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर येथील वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक कार्यालयाला दिले आहे.

खासदार माने यांनी वन खात्याला दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे कि, या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असतानाही वन खाते कोणतीही कारवाई करीत नसल्याचे आरोप शेतकरी वर्गातून होत आहेत. तेंव्हा परिसरातील बिबट्याला तत्काळ जेरबंद करून जंगलात सोडून द्यावे.

हा बिबट्या त्याच्या दोन बछड्यांसोबत वावरत असून, शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ते फस्त करीत आहेत. याचबरोबर मानवी वस्तीत शिरून ते मानवी जीवितास धोकादायक ठरत आहे. तेंव्हा त्वरित कारवाई व्हावी, असे देखील पात्रात नमूद केले आहे.