राजकीयसामाजिक

भविष्यात आपली कामे, हीच पोच पावती असेल- माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर

शाहुवाडी : भविष्यात असं काम करा कि, तुमच्या कामाची पोच पावती जनता देईल. माजी सभापती विजय खोत यांना संकटाच्या काळात पदे मिळाली. परंतु त्यावर मात करीत, त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. संकट काळात देखील त्यांनी शित्तूर वारुण सारख्या तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ते पोहचले. माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी देखील कोरोना सारख्या संकटकाळात केवळ बांधकाम सभापती नसतो, तर त्यासोबत आरोग्य सभापती देखील असतो, अशी आपली स्वत:ची ओळख कामाच्या माध्यमातून करून दिली आहे. असेच काम नूतन सभापती व उपसभापती यांनी करून दाखवावे, कारण भविष्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशा काळात आपली खरी ओळख कामातून निर्माण करावी, याचबरोबर त्यांनी नूतन सभापती सौ.लतादेवी जालिंदर पाटील, व उपसभापती पांडुरंग पाटील यांना शुभेच्छा आहेत. असे मत माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केले.


शाहुवाडी पंचायत समिती च्या सभागृहात सौ.लतादेवी यांची सभापती पदी तर श्री पांडुरंग पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड संपन्न झाली. यानंतर पंचायत समिती च्या हॉल मध्ये त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर होते. यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना माजी आमदार सत्यजित पाटील बोलत होते.


ते पुढे म्हणाले कि, सलग १० वर्षे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ करण्याचा यशस्वी प्रयत्न माजी सभापती विजय खोत व उपसभापती दिलीप पाटील यांनी केला आहे. भविष्यात देखील अशीच अपेक्षा नूतन सभापती व उपसभापती यांच्याकडून राहील.


यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील सरुडकर दादा म्हणाले कि, भविष्यात आपली लढाई पैशेवान लोकांबरोबर असणार आहे. त्यांना आपण आपल्या कामांच्या माध्यमातून उत्तर दिले पाहिजे. कारण आपण केलेली कामे, हीच आपली शस्त्रे असणार आहेत.असे काम नूतन सभापती व उपसभापती यांचे राहील. आम्ही पदावर नसताना देखील विजय खोत, दिलीप पाटील , हंबीरराव पाटील यांनी आपली कामे चोख बजावली आहेत. आता आपण सगळ्यांनी देखील आप-आपली जबाबदारी चोखपणे बजवावी,अशी अपेक्षा आहे. असेही श्री बाबासाहेब पाटील दादा यांनी सांगितले.


या कार्यक्रमावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना हंबीरराव पाटील बापू म्हणाले कि, कोरोना काळात खऱ्या अर्थाने काम काय असते, आणि केवळ बांधकामाकडे लक्ष न देता, जनतेचे आरोग्य खऱ्या अर्थाने जपले.आणि त्याचा आशीर्वाद जनतेने दिला,हीच आमची पोच पावती आहे. यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांचे हार्दिक अभिनंदन देखील केले.

यावेळी उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, नूतन सभापती व उपसभापती यांचे हार्दिक अभिनंदन . कमी कालावधीत ते आपल्या कामांचा ठसा उमटवतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.


यावेळी मावळते सभापती विजय खोत म्हणाले कि, विरोधकांनी दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेवू नयेत. दरम्यान सर्व शिक्षक मंडळींनी शाळा सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान वाचवले. अशा शिक्षकांचे मनापासून कौतुक आहे. आमच्या काळात काही शिक्षकांना आमच्या कामाचा फटका बसला, पण त्याचा त्यांनी राग मानु नये. कारण हे सर्व आपल्या भावी पिढीसाठी आम्ही केले, यात आमचा वयैक्तिक कोणताही स्वार्थ नव्हता. तेंव्हा अशा मंडळींची मनापासून माफी मागतो.यावेळी माजी सभापती विजय खोत यांनी नूतन सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी नूतन सभापती सौ.लतादेवी पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि, आम्ही मिळालेल्या संधीचं निश्चितच सोनं करू. सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असे हि त्यांनी सांगितले.


यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, श्री एल.बी. पाटील, उपसभापती पांडुरंग पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.


या कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य नामदेवराव पाटील सावेकर, दत्ता पोवार, श्री रामचंद्र कोकाटे माजी सरपंच शित्तूर तर्फ मलकापूर, संदीप पाटील सुपात्रेकर,, तानाजी चौगुले महाराज बांबवडे आनंदराव पाटील (दाजी) परखंदळे, आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.


आभार माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!