भाडळे सेवा संस्थेवर सत्यजित आबा व मानसिंग दादा गटाची सत्ता
बांबवडे : भाडळे तालुका शाहुवाडी येथील श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल चा भाडळे वि.का.स. सेवा संस्था भाडळे च्या पंचवार्षिक निवडणुकीत मा.आमदार सत्यजित पाटील व मानसिंगराव गायकवाड या संयुक्त गटाचा सर्व जागा जिंकून विजय झाला आहे. भाडळे विकास सेवा संस्थेवर सत्यजित आबा व मानसिंग दादा गटाची सत्ता आल्याने आमदार आबा व मानसिंग दादा गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हि निवडणूक भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल प्रमुख भीमराव नाना तळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या निवडणुकीत रवींद्र तुकाराम जाधव, सदाशिव ज्ञानदेव जाधव, भीमराव ज्ञानू पाटील, कृष्ण दत्तू पाटील, शिवाजी दत्तू पाटील, आनंदा बाळू व्हरकट, महादेव महिपती व्हरकट, विलास रामचंद्र व्हरकट, महिला राखीव गटातून रंजना भीमराव पाटील, सुशीला गजानन पाटील, इतर मागासवर्गीय (ओबीसी ) गटातून दादासो यशवंत पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून हिंदुराव बळवंत कांबळे , असे बारा च्या बारा उमेदवार विजयी झाले आहेत.

ग्रामस्थांच्यावतीने विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.