भारतीय दलित महासंघाचे संस्थापक गौतम कांबळे सर यांचे हृदयविकाराने निधन
बांबवडे : भारतीय दलित महासंघाचे संस्थापक गौतम कांबळे सर यांचे दि.२२ एप्रिल रोजी सकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने पुणे इथे निधन झाले आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने व मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
भारतीय दलित महासंघाचे संस्थापक आणि सर्वसामान्य वर्गाचे ” सर ” आणि आमचे जिवलग मित्र ” गौतम सर ” यांचे दु:खद निधन झाले आहे. एकेकाळी प्रकृती, संस्कृती आणि विकृती यांचं चपखल विश्लेषण करणारे अध्यापक इहलोक सोडून निघून गेले. एकेकाळी दलित समाजाच्या गळ्यातील ताईत असलेलं, हे व्यक्तिमत्व, असं सहजासहजी निघून जाणं, हे दलित समाजाला तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मित्र वर्गाला हे न पेलवणारे आहे.
परंतु सत्य नेहमी सत्य असतं, ते आपल्याला नाकारता येत नाही.आज संध्याकाळ पर्यंत त्यांचे पार्थिव डोणोली इथं आणण्यात येईल, असे समजते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मुकुंद पवार आणि परिवार सहभागी आहोत.