भारतीय बौध्द महासभा शाहुवाडी च्यावतीने आदर्श मान्यवरांचा सन्मान : धम्म चक्र प्रवर्तन दिन सांगता समारोप
शाहुवाडी : दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा शाहुवाडी यांच्यावतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारोप दि.७ नोव्हेंबर रोजी शाहुवाडी येथील संकल्प सिद्धी कार्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांना आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आदर्श धम्मभूषण सन्मानाचे अनेकजण मानकरी ठरले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना भिकाजी कांबळे म्हणाले कि, सर्वच जणांनी आपल्या धम्मासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.तसेच सगळ्यांनी बौध्द धम्माचा प्रसार करावा, तसेच धम्माची तत्वे लोकांना समजावून सांगावीत. जेणेकरून आपल्या धम्माप्रती इतरांचा आदर वाढेल,आणि आपल्या धम्माची उंची वाढेल.

यावेळी २२ जणांना आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये उचत चे सीताई उद्योग समूहाचे आनंदराव कांबळे यांचे नाव आहे. त्यांनी तालुक्यात उद्योग वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
यावेळी ३८ जण आदर्श धम्म भूषण सन्मानाचे मानकरी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयु.भिकाजी कांबळे मानोली, डॉ. रा.ज. शित्तुरकर, सुरेश कांबळे, जालिंदर कांबळे, बांबवडे गावाचे लोकनियुक्त सरपंच सागर कांबळे, सुदाम कांबळे शाहुवाडी, दामाजी कांबळे शाहुवाडी, सुभाष कांबळे गावडी, यांसह अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु जगन्नाथ कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु प्रदीप कांबळे यांनी केले.